पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा : सेवानिवृत्त कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन मिळत नसल्यामुळे मृत कर्मचा-याचा मृतदेह नातेवाईकांनी औसा तहसील कार्यालयासमोर आणून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या केला. प्रकाश देशमुख परीट हे तहसील कार्यालयात कार्यरत होते . ते ३० एप्रिल २०१९ रोजी निवृत झाले . दि २ आँगस्ट रोजी मूळगावी ( टाका ता.औसा ) रोजी रात्री मुकुंद देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. निवृत्तीवेतन थकल्यामुळे कुटुंबात आर्थिक अडचणी येत होत्या. पेन्शन मिळावे म्हणून सतत पाठपुरावा करूनही पेन्शन मंजुरीच्या कार्यवाहीस विलंब होत असल्याची तक्रार मृत कर्मचा-याची मुलगी सौ प्रियंका प्रशांत जाधव यांनी करीत या प्रकरणी दोषींवर कार्यवाही होईपर्यंत आम्ही मृतदेह तहसील कार्यालयात समोरून हलवणार नाही अशी भूमिका घेतली.
नातेवाईकांनी औसा तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे, पंचायत समिती सभापती अर्चना गायकवाड आदी उपस्थित होते. मयत कर्मचारी मुकुंद देशमुख यांच्या निवृतीवेतनाचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याची तहसीलदार शोभा पुजारी यांनी दिली. ऑनलाईन प्रणाली व इतर कारणामुळे वेळ लागत असला तरी या प्रकरणी दोषींवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी नातेवाईकांना दिले.
दि. ३० जुलै २०२१ रोजी ऑनलाईन प्रक्रिया केली असून राहिलेली रक्कम मिळण्याची कार्यवाही दोन-तीन दिवसात करण्यात येईल असेही तहसीलदार यांनी यावेळी म्हटले तसेच सेवा पुस्तकात महालेखाकार कार्यालय नागपुर यांनी काढलेल्या त्रुटीची पूर्तता ताबडतोब करण्यात येईल भविष्य निर्वाह निधी व इतर रक्कम देण्यात आला असून तात्पुरत्या स्वरूपात पेन्शन मंजुरी दिली असल्याची माहिती तहसीलदार शोभा पुजारी यांनी दिली.
महसूल विभागाचे कर्मचारी दोषी असल्याचा आरोप
या प्रकरणी महसूल विभागाचे कर्मचारी दोषी असल्याचा आरोप मयताचे नातेवाईक करीत होते दोषीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी दोन तासानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी टाका येथे अंत्यविधीसाठी पुढे नेला . यावेळी नायब तहसीलदार वृषाली केसकर, शिवाजी कदम,लाला कांबळे, प्रवीण आळंदकर , पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी उपस्थित होते