17 ते 18 वर्ष देश सेवा तसेच वीस वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक देविदास निमकंडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच पार पडला
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
माजी सैनिक देविदास सुखदेव निमकंडे हे दिनांक 31/07/2021 रोजी महाराष्ट्र पोलीस मध्ये 20 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले .त्या निमीत्य त्यांच्या सत्काराचे आयोजन माजी सैनिक संघटना तालुका शाखा पातूर व निमकंडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले. देविदास निमकंडे कार्यक्रम स्थळी येताच माजी सैनिक विजय जाधव यांनी स्वागत बिगुल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांची आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. माजी सैनिक संघटना अध्यक्ष तुकाराम निलखन यांनी देविदास निमकंडे यांना फूल माला अर्पन करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.त्या नंतर माजी सैनिकांच्या सत्कारामध्ये अंबादास टप्पे,प्रशांत निलखन,घायाळकर साहेब,डिगांबर गाडगे,वसंता बंड,विजय जाधव, रविंद्र श्रीनाथ,दिनेश कठाळे,संजय बगाडे,दिपक गाडगे,गोपाल हरणे आजी सैनिक सचिन तायडे,सदानंद सावत यांचा पुष्प गुच्छ,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला महादेवराव गणेशे, रामदास खोकले साहेब,पांडूरंग सातव,तिमांडे महाराज,अनंता बगाडे,दिलीप बायास,देवानंद गाडगे,संजय राऊत,श्रीराम बोचरे,सुनिल निमकंडे,अक्षय निमकंडे,दिपक शिंदे,विजय राऊतयासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रितेश रौंदळे यांनी केले आभार रविद्र श्रीनाथ यांनी मानून भारत माता की,जय वंदे मातरम,जय जवान,जय किसान च्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



 
                                                                                                
							






