संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- सध्या संपूर्ण जगभरात सुरू असलेले आंदोलन म्हणजेच बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, याकरिता ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम ही भारतातील बौद्धांचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक संघटन असून मागील अनेक दिवसांपासून बोधगया महाबोधि महाविहार, बिहार येथे आंदोलन करीत आहेत,व उपोषणाला बसलेले आहेत, धरणे आंदोलन सुरू आहे याला पाठींबा म्हणून आज घाटंजी येथील संपूर्ण खेड्यापाड्यातून आलेले आंबेडकरी अनुयायी एकत्र येऊन स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर घाटंजी येथून ते तहसील कार्यालय असा विशाल शांती मार्च काढला.बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण जगातील बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असून जगभरातील अनेक देशातील बौद्ध अनुयायी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात.कारण याच ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांना सम्यक ज्ञान प्राप्ती झाली आणि सिद्धार्थ हे बुद्ध झाले. या शांती मार्चमध्ये महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपविण्यात यावे. बिहार सरकारचा बौद्ध मंदिर कायदा 1949 रद्द व्हावा.आणि स्थानिक बिहार येथील बौद्ध भन्ते जे शांततामय आंदोलन महाबोधी महाविहार बोधगया येथे सुरू केलेले आहे, त्या बौद्ध धम्मप्रचारक बौद्ध भन्ते सन्मानजनक वागणूक मिळण्यात यावी. त्यांचा कुठल्याही प्रकारे अनादर होऊ नये.या अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हा शांती मार्च अतिशय शांततेने आणि शिस्तबद्धतेने तहसील कार्यालय येथे पोहोचला. यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती घाटंजीचे मुख्य संयोजक डॉ.सुरज ढाले आणि संयोजक संघपाल कांबळे,सल्लागार संतोष जीवने,निमंत्रक श्यामराव मुनेश्वर,प्रा. म.ना.कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. बुद्धगया महाबोधि महाविहार हे संपूर्ण जगातील बौद्धांचे आदर्श आणि पवित्र स्थान असून ते मुक्त व्हावे.अशा प्रकारचे निवेदन समितीतर्फे मा. राष्ट्रपती भारत सरकार यांना देण्यात आले.यावेळी नुक्ती,साखरा पारवा, सोनखास,किन्ही,सावरगाव,आकपुरी, अकोला बाजार,मांजर्डा, तिवसाळा, ससाणी,कुंभारी,वन किन्ही,येरंडगाव,शरद,मुरली,मारेगावकुऱ्हाड, माणूसधरी, घोटी, शिरोली, पंगडी, आमडी,खापरी,चोरंबा, जरूर,घोटी,विरूळ कौठा,अशा अनेक गावामधून आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली. या शांतीमार्च चे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शिस्तबद्धतेने आणि शांततेने चाललेला हा मार्च होता.या शांती मार्च करिता बोधगया महाबोधी महाविहार नुक्ती आंदोलन समिती घाटंजीचे सर्व पदाधिकारी सुनील नगराळे,अशोक खरतडे अजय गजभिये, विजय सिसले, रामराव नगराळे, विजय रामटेके, योगेश कांबळे,सुखदेवराव रामटेके,उमेश नगराळे, पद्माताई खोब्रागडे,नीलम रामटेके, ज्योती रामटेके, शोभा अलोणे, संगीता जाधव, रंजना हुमे, करूणा नरांजे, शालिनी रामटेके, शशिकला नैनपार, प्रज्ञा रामटेके, लक्ष्मीबाई सोनटक्के, महिमा खोब्रागडे,या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. मेहनत घेतली.आजचा शांती मार्च हा जगातील संपूर्ण बुद्धाच्या अस्मितेचे प्रतीक होते व जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत वेळोवेळी,प्रसंगी ही समिती शिस्तबद्धतेने, शांततेने निवेदने तथा मोर्चा, आंदोलन करून आपल्या अस्मितेकरिता लढा देणार असल्याचे समितीचे प्रवक्ता सतीश रामटेके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले संचालन गुलाब सिसले यांनी आभार निमंत्रक सुरेश जाधव यांनी केले .


