सदानंद पुरी शहर प्रतिनिधी माहुरगड
माहूर …. तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे मुंगशी येथील विनोद विजय जाधव वय 50वर्ष या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाच्या चिंतेने जंगलातील सागवानाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 10 दहा रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे.माहुर तालुक्यातील मौजे मुंगशी येथील रहिवासी विनोद जाधव यांच्याकडे तीन एकर शेती असून त्यांना आई-वडील ,पत्नी दोन मुले, मुलगी आहे, मुलीचे लग्न झाले आहे त्यांचे वर बँकेचे कर्ज होते ते कर्ज कसे फेडावे या तणावात ते सतत राहत होते. आज दि ,10 सकाळी घरून शेतात जातो म्हणून निघाले असता मुंगशी शिवारातील विष्णू पिटलेवाड यांच्या शेता शेजारी असलेल्या जंगलातील सागवान झाडाला त्यांनी दहा वाजताच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, सदरील बाब नागरिकांना माहित झाल्याने तत्काळ माहुर पोलीस ठाण्यात घटनेची कल्पना दिली. घटना माहीत झाल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे साहेब यांनी तात्काळ पोहेका प्रकाश गेडाम पो का ज्ञानेश्वर वेलदोडे यांना घटनास्थळी पाठवून पंचानामा करत शव वानोळा येथील रुग्णालयात आणले असता, येथे डॉ शिवाजी आत्राम यांनी शवविच्छेदन केले. सपोनी शिवप्रकाश मुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेका प्रकाश गेडाम ,पोका ज्ञानेश्वर वेलदोडे करीत आहेत . विनोद जाधव यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


