कार्यक्रमाचे अध्यक्षा अँड, रुपालीताई गेडाम यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार
व्येकटेश चालुरकर तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी दिनांक 08 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज दि. 10/03/2025 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. एम रमेश सा.(अपर पो.अधीक्षक प्रशासन) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. सत्यसाई कार्तिक सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा.श्री. अजय कोकाटे सा.उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता अहेरी , यांचे मार्गदर्शनाखाली उप पोस्टे राजाराम खां येथे भव्य जागतिक महिला दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर भव्य जागतिक महिला दिन मेळाव्याचे अध्यक्ष मा. श्रीमती रुपाली माकडे / गेडाम (ॲडव्होकेट) तर कार्यक्रमांचे उदघाटक श्रीमती मंगला आत्राम (सरपंच राजाराम), कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे मा. श्रीमती सुमन आलाम ( सरपंच चिरेपल्ली) , मा. श्रीमती श्वेता वालदे (CHO प्रा. आ. केंद्र राजाराम), श्रीमती शितल होके ( अधिक्षीका भ. मा. आ. शाळा राजाराम),श्रीमती शिवाजी परवते (परिचारीका कोरेपल्ली), श्रीमती चित्रा मेश्राम (परिचारीका राजाराम) ,हर्षदा नैताम (शिक्षिका) ,श्रीमती सुमैधा केंद्रे (BPM पोस्ट ऑफिस राजाराम तसेच जिल्हा पोलिस अधि./अंम. SRPF अधि./अंम. व हद्दीतील 100 ते 150 महिला व नागरिक उपस्थित होते. सदर भव्य जागतिक महिला दिन मेळाव्याची सुरुवात स्वराज्य प्रेरिका माता जिजाऊ, लोकमाता पुण्य श्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पाहूण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून भव्य जागतिक महिला दिन मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. सदर भव्य जागतिक महिला दिन मेळाव्यात प्रभारी अधिकारी पोउपनि सचिन चौधरी, दुय्यम प्रभारी अधिकारी पोउपनि-आकाश जाधव हे जागतिक महिला दिन मेळाव्याची प्रास्ताविका मांडले मेळाव्यात आलेल्या जनतेस मार्गदर्शन केले यानंतर कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्रीमती रुपाली माकडे (ॲडव्होकेट) यांनी उपस्थित महिला व नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे लाभलेले श्रीमती श्वेता वाले (CHO प्रा. आ. केंद्र राजाराम),. यांनी मार्गदर्शन केले सदर जागतिक महिला दिन मेळाव्याला राजाराम, चिरेपल्ली येथिल सरपंच, राजाराम चे ॲडव्होकेट मॅडम,प्रा.आ.केंद्र राजाराम,भ.मा.आ.शाळेचे अधिक्षीका, शिक्षीका, परिचारिका तसेच पोस्ट ऑफिस राजाराम हे उपस्थित दर्शवली मेळाव्यात गावातील नागरिक, महिला मेळाव्या करीता उपस्थित झाले. सदर मेळाव्यात महिलांकरीता संगीत खुर्ची, बकेट बाॅल खेळ ठेवण्यात आले सदर स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय असे तीन विजेताना पारितोषिक देण्यात आले. सदर भव्य जागतिक महिला दिन मेळाव्यात उपस्थित 100 महिलाना साड्या वाटप करण्यात आले. तसेच 20 महिलांना घमेले वाटप करण्यात आले. तसेच सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्या नंतर सर्वाना जेवण ची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उप पोस्टे राजाराम खां येथील जिल्हा पोलीसचे सर्व अधिकारी , अंमलदार, तसेच एसआरपीएफचे अधिकारी अंमलदार व spo यांनी मोलाचे सहकार्य केले .सदर मेळावा 10.00 वा. सुरू करून 16.00 वा. यसस्वीरित्या कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यात आला.पोउपनि सचिन चौधरी प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन राजाराम (खां)


