विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ :उमरखेड पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश शंकर सरदार व उमरखेडचे ठाणेदार सा.व.पोनि शंकर पांचाळ व पो. शि.गिते नं.९२४ व माझ्यावर खोटे गुन्हे नोंद केले .यांनी मला दि. ०४/०३/२०२५ वेळ अंदाजे १.४५ च्या दरम्यान बोलुन उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे दुरूपयोग माझे सोबत चुकीचे वर्तणुक केले आहे, चौकशी करून कार्यवाही व बडतर्फ व पत्रकार सुरक्षा कायदे अंतर्गत ७ दिवसाचे आत कार्यवाही. करा अशी मागणी इरफान शेख यांनी केली आहे. इरफान शेख यांनी लेखी तक्रार मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस आयुक्त अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना तक्रार इरफान शेख यांनी केली आहे .उमरखेड वार्ता संपादक शे. ईरफान शे ईसा व सदर विडुळ प्रकरणातील आरोपी पो.स्टे. उमरखेड येथे असल्यामुळे सदर आरोपीची आई व त्याची मोठी माय भेटायला आली होती. एपीआय सरदार व त्याचे रायटर गिते माझ्या अंगावर धावुन आले व मानेला धरून मला धक्के देवुन पो.स्टे. चे बाहेर धक्का मारून सोडुन दिले. उमरखेड पो.स्टे. मधील लावलेले सिसिटीव्ही फुटेज मध्ये सगळा प्रकरण रेकॉर्ड झालेला आहे. उमरखेड पो.स्टे. चे कर्मचाऱ्यांने मला फोन लावुन बोलले की ठाणेदार साहेब तुम्हाला बोलवत आहे. यामुळे ठाण्यामध्ये गेलो असता ठाणेदार शंकर पांचाळ यांनी माझ्या सोबत आपल्या पदाचा दुरूपयोग करून पत्रकार सोबत असे करणे योग्य आहे का? म्हणून मी ठाणेदार साहेबाला विचारला असता साहेब माझी काय गलती आहे तर ते म्हणाले की, तुझ्याने जे होते ते कर व अश्लिल भाषेत बोलले मी म्हणालो की, साहेब हे चुकीच होत आहे. माझी चुक कायआहे, आणि माझ्या सोबत संपादक पत्रकारा सोबत असे वागणे योग्य आहे का?असा प्रश्न विचारला असता म्हणतात तु कोर्टात सिध्द कर तुझ्याने जे होते ते करून घे अशी अरेरावीची भाषा ठाणेदार शंकर पांचाळ यांनी वापरली आहे. माझी कोणतीही चुक नसतांनी मला पो.स्टे. ला बोलावुन साडे तीन तास आरोपी सारखे बसुन ठेवले व माझ्या सोबत चुकीची वर्तणुक केली त्यामुळे पोलीस स्टेशन मधील सिसिटीव्ही फुटेज संपुर्ण चेक करण्यात यावे व माझे सोबत जी घटना पो.स्टेशन मध्ये घडली त्याची चौकशी करून उमरखेड चे ठाणेदार व एपीआय व कॉन्सटेबल यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावे तसेच पत्रकार सुरक्षा कायदे अंतर्गत व बडतर्फ कार्यवाही करण्यात यावी. उमरखेड पो.स्टे. • चे ठाणेदार उमरखेड ला रूजु झाले होते २०२३ मध्ये तेव्हा मी व माझे काही मित्र सामाजिक कार्यकर्ते अवैध धंदयात संदर्भात उमरखेड चे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब यांची तक्रार केली होती अवैध धंदे बंद करा म्हणुन तसेच उपोषणला बसलो होते. माझ्या वाढ वाढदिवसाच्या दिवंशी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मी तशी तक्रार दिली होती परंतु माझ्या विरोधात एपीआय सरदार काही राजकीय लोकांचा ऐकुण माझ्यावर वर खोटे गुन्हे दाखल केले. मी त्यांचे विरोधात आमरण उपोषणाला बसलो होतो. तसेच एपीआय सारीका राउत मॅडम यांचे विरोधात एक अवैध रेती ट्रॅक्टर आर्थीक देवाण घेवान घेवुन सोडुन दिला होता. त्याची सुध्दा तकार केली होती. नंतर विडुळ गावामध्ये झालेले प्रकरण चौकशी करा म्हणुन उमरखेड चे ठाणेदार साहेबाला बोललो असता साहेबांनी मुलानवर गुन्हे दाखल केले याची एक लेखी तक्रार केली होती. या सगळया प्रकरणाची चौकशी करून वरील कर्मचाऱ्यावर निलंबन व बडतर्फ करण्यात यावे. माझ्या सोबत पो.स्टे. उमरखेड मधील झालेले घटना दि. ०४/०३/२०२५ रोजी झालेली घटनेची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. उमरखेड चे ठाणेदार साहेब म्हणत आहे की, मी उमरखेड पो.स्टे.मध्ये जसा पाय ठेवला तसे माझ्यावर गुन्हे दाखल करतो असे म्हणने आहे. व अन्यथा मला लोकशाही व संविधानीक मार्गाने आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल. तकार अर्ज दाखल केलेल्या दिनांका पासुन माझे जिवीत्वाचे काही बरे-वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबबादार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब व सोबत त्याचे अधिकारी, कर्मचारी राहतील याची नोंद घ्यावी.


