आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
आज खतगाव ता.बिलोली येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज बिज मंदिर परीसरात दर वर्षी प्रमाणे मोठ्या ऊत्सहात साजरी करण्यात आली. या निमित्त किर्तन व महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आले किर्तनकार हरिभक्त पारायण श्री शंकर महाराज ईब्राहिमपुरकर यांचे किर्तन रत्रि होते तर दि. 16.03.2025.रोजी श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वसुरकर यांचे गुलालाची किर्तन होते .ह्या तुकाराम बिज कार्यक्रमाचे यजमान श्री साईनाथ दिगांबरराव मंडगे हे असुन त्यांच्याकडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.आहे याप्रसंगी प्रमुख म्हणुन *श्रीमान बालासाहेब पाटील खतगावकर, श्रीमान रवि पाटील खतगावकर ऊपस्थित राहुन त्यांच्या हस्ते आर्ती करुन तसेच 2024 मधील 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री व्यंकटराव नामदेवराव खतगावकर तसेच गावातील सर्व लहान थोर महीला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.


