अनिल धोत्रे तालुका प्रतिनिधी, जामखेड
एबी फिटनेस, भिस्तबाग चौक, सावेडी, अहिल्यानगर प्रथम वर्धापन दिनानिमित्त जनकल्याण रक्तपेढी गाडगीळ पटांगण, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी दुपारी पाच वाजता रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी युवकांचा मोठा प्रतिसाद या शिबिरास लाभला. यावेळी 114 रक्त पिशव्यांची संकलन झाले. या कार्यक्रमास भाजपाचे जेष्ठ नेते श्री वसंत लोढा, हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजयजी आडोळे, श्री नितीनजी उदमले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्री सचिन पारखी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भैया गंधे, श्री चंद्रकांत जी जाधव, ॲड युवराज पोटे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ मढीकर, ऍड भाऊसाहेब पालवे, श्री श्याम पिंपळे, श्री रमेश पिंपळे, श्री बाळासाहेब गायकवाड, प्रा भानुदास बेरड, श्री राहुल अष्टेकर, श्री देविदास वारुळे, श्री सुयोग धामणे, श्री अंकुश गोळे, श्री प्रशांत देठे, श्रीशांत दातीर, श्री मनीष अष्टेकर, प्रा तानाजी काळुंगे, प्रा अनिल आचार्य, नगरसेवक श्री मनोज दुल्लम, श्री सागर मुर्तडकर, श्री प्रणव चन्ना, श्री सुदर्शन भांबरकर, श्री हेरंब कासार, आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी एबी फिटनेस च्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी एबी फिटनेसचे श्री विवेक भानुदास बेरड व ओमकार अष्टेकर, श्री अथर्व अष्टेकर, श्री ओम पालवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


