त्रिफुल ढेवले ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : तिवसा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व. दिनेश वानखडे व शहीद सागर हिमाने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनेश नाना वानखडे मित्र मंडळ व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शालिनी मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर, जीवन आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने तिवसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या रोगनिदान शिबिर व आरोग्य शिबिराचा एकूण ५६० नागरिकांनी लाभ घेतला. तर शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात १६७ रुग्णांना तपासणीनंतर निःशुल्क शस्त्रक्रियेसाठी मेघे हॉस्पिटल येथे पाठवले जाणार आहे. सामाजिक दायित्व जपणाऱ्या या शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. या शिबिराला माजी जि. प. सभापती दिलीप काळबांडे, प्रहारचे संजय देशमुख, योगेश लोखंडे, नगरसेविका सुवर्णा अजय आमले, नगरसेविका प्रीती दिवाकर भुरभुरे, नगरसेविका प्रिया नरेंद्र विघ्ने, नगरसेवक अमर वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने, दिवाकर भुरभुरे, सेतू देशमुख, राजाभाऊ देशमुख यांनी भेट दिली. या वेळी आयोजक युवती सेना जिल्हाप्रमुख तेजस्विनी दिनेशनाना वानखडे, प्रहार शहरप्रमुख बाळा देशमुख, अजय आमले, गणेश डोळस, नंदकिशोर देशमुख, विलास खेडकर, भूषण देशमुख, अभय वानखडे, मनोज काळमेघ, विशाल दुर्गे, प्रवीण वानखडे, रोशन खोब्रागडे, अल्पेश ठाकरे, अतुल चितारे, पप्पू मारबदे, अमोल गोहत्रे, आयुष ठाकरे, सारंग हिवसे व शेकडो प्रहार कार्यकर्ते व दिनेशनाना समर्थक उपस्थित होते.


