मनोज बिरादार ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
बंगळूरू नॉर्थ युनिव्हर्सिटी,बंगलूरू येथे दि.14/03/25 ते दि.17/03/25 या तारखेत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन (पुरुष) स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संघात देगलूर महाविद्यालयचे खेळाडू, गायकवाड प्रमोद व इबितवार गोरोबा या दोन मुलांचे विद्यापीठीय संघात निवड झाली आहे.या विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.06/03/2025 ते दि.11/03/2025 दरम्यान महात्मा फुले महाविद्यालय,किनगाव येथे संपन्न झाला असून या मुलांच्या संघास शुभेच्छा देतेवेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.भास्कर माने, विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ मुंडे चेतन हे आहेत.तसेच महाविद्यालयाचे प्रशिक्षक डॉ.निरज उपलंचवार आणि मार्गदर्शक म्हणून प्रा.दिपक वावधाने,प्रा हाके सिताराम व श्री कांबळे मधुकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे,सूर्यकांत नारलावार,गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार,गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर,गोविंदप्रसाद झंवर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार,उपप्राचार्य प्रा. चमकुडे एम.एम. उपप्राचार्य डॉ.शेरिकर व्ही.जी.,पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील,कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.


