शेख शेमशुध्दीन तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेड दि. ११रोजी येथील मौजे वाई च्या रावसाहेब मानिका ढगे या शेतकऱ्यांने सततची नापीकी व बँकेने खाते व्होल्ड केल्याने स्वतःची जीवन यात्रा गळफास लावून संपविली आहे.सविस्तर वृत्त असे की,रावसाहेब पिता मानिका ढगे रा. वाई ता. मुदखेड जि. नांदेड हे आपल्या कोरडवाहू शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत.सतत होणारी नापिकी या मुळे बँक व खाजगी सावकारांच्या कर्ज पाशात अडकल्याने निरंतर होणारी कुचंबना यामुळे आधीच व्यतिथ झाले होते, त्यातच वडिलोपार्जित घर मोडकळीस झाल्याने कुटुंब उघड्यावर आले म्हणून राहण्यापुरते बांधकाम करण्यासाठी काम हाती घेतले होते. आर्थिक दुस्ट चक्रमुळे बांधकाम उरकता उरकत नव्हते, त्यातच थकीत कर्ज झाल्याने बँकेने खाते व्होल्ड केले, यामुळे खाजगी गृह कर्ज देणाऱ्या खाजगी कंपनीने कर्ज नाकारले, तुटपुंज्या रोज मजुरीतून जमावलेली पुंजी संपून गेली, वेळेवर कोणतेच कामे होत नव्हती, यातच शासनाचे पंतप्रधान सन्मान निधी व दुष्काळ या सारखे मिळणारे अनुदान बँक खाते व्होल्ड झाल्याने अडकून पडले यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी राजाने अखेर अर्धवट बांधकामास सुम्ब बांधून स्वतःच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा दि. १० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी १०:३० च्या दरम्यान आपली जीवन यात्रा संपविली. त्यांच्या पसच्यात आई सुभद्राबाई माणिक ढगे, पत्नी सत्वशीलाबाई रावसाहेब ढगे, मुलगा माणिक रावसाहेब ढगे, मुलगी मीनाबाई गंगाधर पंडागळे असा परिवार असून, मुदखेड येथील पोलीस स्थानकात आकस्मित मृत्युंची नोंद घेण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे दि. ११ मार्च २०२५ रोजी शव विच्छेदन झाल्यानंतर मौजे वाई येथे साश्रू नयनाने नातेवाईक व गावाकऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, पंच क्रोशीत शोक कळा पसरली आहे.


