केशव सातपुते ग्रामीण प्रतिनिधी किनगाव जट्टू
किनगाव जटूटू . होळी हा आपल्या सणांमध्ये अत्यंत महत्त्वाचा सण समजला जातो, त्यामुळे अत्यंत आनंदाच्या भरात होळी साजरी केल्या जाते, परंतु होळी हा सण साजरा करताना अनेक लोक शेणाच्या गवऱ्या, लाकूड, सरपंन, पुरणपोळीचा नैवेद्य, जाळा मध्ये टाकून सण साजरा करतात. तसेच रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा गैरवापर करतात, यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून, पाणीटंचाई जाणवत आहे, या ऐवजी प्रत्येकाने, आपल्या मनातील घाण दूर करून, तसेच स्वच्छता मोहीम राबवून, पाण्याची बचत करून, व झाडाची पूजा करून, होळी हा सण साजरा करावा, म्हणजे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल, असे कळकळीचे आवाहन, पर्यावरण प्रेमी विनोद सातपुते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे..


