रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : तालुक्यातील मौजा काळी दौ ग्रामपंचायत अंतर्गत खनिज विकास निधी योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम करन्यात आले.मात्र सदर कामाच्या आॅनलाईन निवीदा न करताच काम करन्यात आले व रस्त्याचे काम झाल्यावर आॅनलाईन निवीदा करुन त्या मॅनेज केल्याचा शडयंत्र काळी दौ.येथील ग्रामपंचायतीच्या पद अधिकाऱ्यांकडून घडल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे.ग्रामपंचायत माध्यमातून खनिज विकास निधी अंतर्गत कामे झाल्यावर निवीदा करुन त्या मॅनेज करन्यात आल्या आहेत अशा आशयेची लेखी तक्रार येथील राजेश राठोड (सामाजिक कार्यकर्ते) काळी दौ. यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.त्या तक्रारी नुसार वि.गटविकास अधिकारी साहेब यांनी चौकशी समिती नेमली असून दिनांक ०७/०३/२०२५ रोजी हि चौकशी सहायक गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली श्री एस.डी.जाधव विस्तार अधिकारी पंचा,श्री आर.टी.जाधव.सहायक लेखा अधिकारी प.स.महागांव,श्री अमोल जाधव कनिष्ठ अभियंता, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असुन तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित कार्यालयास देण्यात आले आहे या प्रकरणात दोशीवर कायदेशीर कार्यवाही होणार की ठेकेदारासह ग्रामपंचायत पदाधिकारी पुन्हा मॅनेज करुन बाहेर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


