रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : तालुक्यातील माळवागद येथील शंकर राघो हटकर यांच्या घरावर चालु विजेचा पोल कोसळला.या घटनेत मोठी जीवीत हाणी टळली आहे.विदयुत पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे व कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे अशा घटना घडत असल्याचे येथील नागरिकांमधून बोलल्या जात आहे.काळी दौ.येथील महावितरण केंद्रातुन माळवागद येथे विज पुरवठा केला जातो.मात्र विद्युत पुरवठा कर्मचारी यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे येथील जवळपास दहा, ते पंधरा, कुटुंबांचे जीव धोक्यात असल्याचे लेखी निवेदन येथील नागरिकांनी वांरवार कार्यालयात दिले परंतु विद्युत पुरवठा कर्मचारऱ्याकडुन कोणतीही दखल घेन्यात आली नसल्याने अखेर येथील शंकर राघो हटकर यांच्या घरावर आज सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान चालू असलेले विद्युत खांब कोसळले घरावर टीन पत्रे असल्याने तात्काळ घरातील कुटुंब वेगाने धावपळ करीत घराबाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.या पुर्वी येथील नागरिकांनी अनेक वेळा विद्युत पुरवठा कार्यालयात लेखी निवेदन देऊनही कोणतीही दखल घेन्यात आली नाही.अशी येथील नागरिकांमधुन ओरड आहे करीता निष्काळजी व बेजबाबदार पध्दतीने काम करनाऱ्या विद्युत पुरवठा कर्मचारऱ्यांची तात्काळ बदली करून विद्युत पुरवठा अधिक्षक अभियंता यांनी दखल घेऊन कर्तव्यदक्ष कर्मचारी येथील डीव्हीजनवर देण्याची मागणी गावकऱ्यांमधुन होत आहे.चौकटमहागांव तालुक्यातील माळवागद येथील विद्युत खांब झाड कापल्याने पडले आहे विद्युत खांब जवळ असलेले झाड कापल्याने तंगावे सुटले आणि खांब घरावर कोसळले तरी पण तात्काळ दखल घेउन कर्मचारी दुरूस्तीसाठी पाठवले आहे.विद्युत पुरवठा अभियंता


