गुणवंत्तापूर्ण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकासाची संधी देणे. ही आयडियल इन्ग्लिश मेडीयम स्कुलचे वैशिष्ट्य
मनोज बिरादार ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
देगलूर – दि. ११-०३-२०२५ रोजी फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचलित आयडियल इंग्लिश मेडीयम स्कुल येथे वार्षिक स्नेहसंमेलन धूमधडक्यात पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून देगलूर येथील नामांकित व्यक्तिमत्व असणारे सौ. राधिका नरेश अडीशरलावार आणि हेमलताताई विशवनाथ पवार यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन समईचे दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने झाले. तसेच आपल्या देशाला दैदीप्यामान बनवण्यासाठी ज्या अनेक महापुरुषांनी व महान राष्ट्र मातांनी आपल्या कर्तृत्वानी देश घडविला आणि सर्व मानवाला समतेचा,स्वातंत्र्यचा,बंधूभावाचा, विकासाचा, प्रगतीचा संदेश दिला आणि देशात जे क्रांतीकारी बदल घडविले अश्या सर्व महापुरुषांना पुष्प हर अर्पण करून विनम्र अभिनंदन करण्यात आले.म. बसवेश्वर,राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई,डॉ.अण्णाभाऊ साठे, ए. पी. जे. अब्दुल कलाम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव माळगे सर, डॉ.उत्तम इंगोले सर,शेख फैज सर डॉ, सीताफुले सर, मिलिंद राजूरकर सर,बालाजी देवदे सर,अर्जुन कांबळे साहेब ,शिवराज कांबळे बिजलीकर पत्रकार मिलिंद वाघमारे सर, पत्रकार मनोज पाटील बिरादार सर,संचालक प्रा. सोनकांबळे एम. एल. सर. व प्राचार्या सुनंदा मॅडम यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व उदघाटन म्हणून लाभलेल्या राधिका नरेश अडीशरलवार यांचा सत्कार शाल व पुष्पहार देऊन अनुराधा कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच हेमलताताई विश्वनाथ पवार यांचा सत्कार सुधा संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल व पुष्प हार देऊन करण्यात आला. तसेच उत्कृष्ट पालक म्हणून मष्णाजी देवदे, गौतम सोनकांबळे, बाबाराव पाटील गोणारे, दयानंद सोकांबळे, एकनाथ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नर्सरी पासून ते ५ व्या वर्गापर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्ती, लावणी, नाटक,शेतकरी,शाळेवर आधारित गाण्यावर विद्यार्थ्यांनी अप्रतिम डान्स करून आपली कला उत्कृष्ट रित्या सादर करून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रा.सोनकांबळे सर यांनी करत असताना स्कुलच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. आणि भविष्यातील उदिष्ट पुर्ण करण्यासाठी व विध्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू असे आश्वासन दिले. आमचे विद्यार्थी उच्च पदावर, विविध क्षेत्रात जाऊन समाज व देशसेवा करावी हेच आमचे ध्येय आहे. आज सामान्य पालकांना शिक्षण महाग झाले आहे. अशा परिस्थितीतआम्ही गुणवतापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट सोयी सुविधा मुलांना अत्यंत उत्कृष्ट देत आहोत. येणाऱ्या काळात प्रत्येक वर्गात ऑडिओ, व्हिडीओ, साधनाच्या आधारे मुलांना सहज समजेल आणि त्यांचा बौद्धिक, भावनिक विकास, व्यक्तिमत्व विकास आणि गुणात्मक विकास घडून येईल व आमचे सर्व विध्यार्थी त्यांचे भविष्य उज्वल घडवतील याची शास्वती दिली. तसेच डॉ. भीमराव माळगे सर यांनी आयडियल इंग्लिश मेडीयम स्कुल च्या उपक्रमाचे कौतुक केले.आणि मोठे अधिकारी विध्यार्थी बनावे यासाठी पालकांनी लक्ष द्यावेत. कोणत्याही विध्यार्थ्यांना त्याचे उज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळू शकते ते मात्र त्यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उत्तम इंगोले साहेब बोलताना म्हणाले की, आज मुलांना घडवण्याची खरी जबाबदारी ही प्रथम पालकांची आहे. त्यांनी मुलांना मोबाईलचा वापर कमी करावा आणि त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावेत. मुलांचे राहणीमान आणि वागणे हे ही बदलले पाहिजे.ही बदलत्या काळाची गरज आहे असे मत मांडले. यावेळी शेख फैज सर यांनी मुलांना घडविण्याची प्रक्रिया ही बालपणीच असते. योग्य वेळी योग्य संस्कार मुलांवर झाले पाहिजेत तरच मुलांचे भविष्य उज्वल घडते. असे मत मांडले. आणि स्कुलच्या प्रगती साठी शुभेच्छा दिल्या. इतर सर्व मान्यवरांनी शुभेच्छा पर संदेश दिला. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम अधिक उत्कृष्ट करण्यासाठी स्कुलच्या आदर्श शिक्षिका सोनाली भोकरे मॅडम, श्रद्धा मॅडम यांनी बहारदार आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून वार्षिक स्नेहसंमेलन अधिक प्रभावी बनवले.कार्यक्रमाचे आभार अश्विनी मॅडम आणि प्राची मॅडम यांनी केले.


