कंचनपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थींचा पुढाकार
करामत शाह तालुका प्रतिनिधी अकोला
कंचनपूर : जिल्हा परिषद कंचनपूर शाळेत१९९० ते १९९५ या कालावधी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता माजी विद्यार्थीनी दि .९ मार्च २५ ला मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात विदयार्थ्याना ज्ञानर्जन करणारे तत्कालीन शिक्षक अब्दुल गनी पांडे , ज्ञानेश्वर मांडेकर,सुभाष फुकट,विजय देशमुख, दिंगबर अटकर, प्रताप वानखडे, व आज रोजी कार्यरत असलेले शरद शेगोकार आंमत्रित करण्यात येवून व्यासपीठावर उपस्थित होते.आज रोजी मिल्टी,विधिज्ञ ,बॅकिंग,व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी,सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी,व्यापारी, गृहीणी, बचत गट , प्रतिष्ठीत अश्या विविध क्षेञात कार्यरत असलेले कंचनपूर शाळेतील माजी यांनी उत्स्फूर्तने शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त मेळाव्याचे आयोजन केले होते .मेळाव्याचे दिप प्रज्वलन करून रितसर उद्घाटन शिक्षका तर्फे करण्यात आले.सौ . प्रतिक्षा पागृत हिने प्रास्ताविक सादर करीत विद्यार्थ्याच्या शालेय भावना व्यक्त करीत. आठवणीला उजाळा दिला तर अँड. कैलास अनमाने , CRPF नितीन ठाकरे, पोलीस पाटील विठ्ठल शेळके यांनी शालेय जीवनातील संस्कारामुळे आम्ही आमच्या क्षेत्रात अग्रेसर आहोत या विषयी अनेक विविध मुदयाचे विश्वलेषण केले. शाळेत माजी शिक्षक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी विदयार्थी संस्कारक्षम घडवू शकलो हे श्रेय विद्यामंदीरा (जि. प शाळा कंचनपूर ) ला दिले. आज समाजातील सकारात्मक बाबी विद्यार्थ्याच्या समोर सादर करून नवपिढीत विद्यार्थी प्रगत होण्या संबधी हितगुज करीत कंचनपूर गाव हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहण्या संबधी रुपरेषा सह संकल्पना व्यक्त केली . तर माजी शिक्षक अब्दुल पांडे, सुभाष फुकट, विजय देशमुख, दिंगबर अटकर, प्रताप वानखडे, शरद शेगोकार, अक्षय पागृत यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.गावातील शिक्षण प्रेमी बळीरामजी चोरे, अनेक प्रतिष्ठीत नागरीक माजी विदयार्थी वर्षा आवारे कीर्ती ताई खांडे अर्चना बेंडे अर्चना हलवणे शुभांगी तायडे मंगला बावस्कार सोनू टाले दिपाली गावंडे ज्योती राऊत सोनू ताई गावंडे दिनेश चोरे राजेंद्र शेळके नारायण चौरे ज्ञानेश्वर शेळके गोपाल शेळके रामचोरे मनोज अन माने रुपेश चोरे सुनील गावंडे ओम अवाती र उज्वल शेळके शैलेश शेळके शरद चौरे ज्ञानेश्वर हलवणे सासुरवासिणी माहेरात शिक्षकासाठी आल्याने विद्यार्थानीच्या आईवडीलांनाचा वेगळाच आनंद लपवू शकला नाही . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक शिवशंकर डिक्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन चोरे यांनी केले


