शहरातील पाणीपुरवठा दहा-बारा दिवसांवर
राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
उन्हाळ्याची चाऊल लागतात पाणी टंचाईचा प्रश्न चांगलाच भिडू लागलाय शहरातील काही भाग हा उंच असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा होत नसून आठ ते दहा दिवसांवर गेल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे व त्या भागामध्ये पाण्याचा कुठलाही स्त्रोत नसल्यामुळे तसेच नगरपालिकेचा पाणीपुरवठा हा विलंबाने होत असल्यामुळे नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. दिग्रस शहराला पाणीपुरवठा करणारे एक अरुणावती प्रकल्प आणि नांदगाव धरण असून कोठे होती खर्च होऊन सुद्धा नांदगाव धरणातून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांची ओरड ऐकायला मिळतात. वास्तविक पाहता दिग्रस नगरपालिकेच्या मालकीचे नांदगाव धरण सायफनपद्धतीचे असून या या पद्धतीमध्ये धरणातून पिण्याच्या टाकीपर्यंत कुठलेही इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने धरणातील पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये सायफन पद्धतीने पुरविल्या जाते. तसेच शहराला लागूनच असलेला अरुणावती प्रकल्प यातून सुद्धा पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीवर पाण्याची रेलचेल असताना नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे घागर मोर्चातील नागरिकांचे आरोप यावेळी माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, चेतन रत्नपारखी, सय्यद अक्रम, भारत पाटील, अरबाज धारीवाला, राहुल देशपांडे सह सर्वपक्षी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.यावेळी यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी निवेदन स्वीकारून ज्या काही अडचणींमुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे त्या दूर करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येईल अशा आश्वासन सुद्धा घागर मोर्चातील नागरिकांना दिले आहे.


