शासकीय नियमांच्या पायमल्ली बाबत अंबड तहसील प्रशासन कारवाई करणार का?
संतोष भवर शहर प्रतिनिधी अंबड
भारतीय लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत त्यापैकी प्रशासन हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत जनतेच्या जनकल्यानाचे कर्तव्य बजावणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. परंतु शोकांतदायी चित्र असे दिसून येते की प्रशासनातील कर्मचारी शासकीय नियमांना बगल देत आपल्या कर्तव्यात कसूर करतात. अंबड तहसील अंतर्गत कार्यरत मंडळ अधिकारी संदीप नरूटे हे वडीगोद्री येथे कार्यरत आहे. सद्यस्थितीत तलाठी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी ते विराजमान आहेत. आणि याच बडेजाव पानात कदाचित त्यांना शासकीय कर्तव्यवस्थेचा दिसून येत नाही. शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या निवासस्थानी निवास न करणे , वडीगोद्री येथे मंडळ अधिकारी पदावर रुजू झाल्यापासून ते आज रोजी पर्यंत त्यांच्या कार्यालयन सर्व केलेल्या कामकाजाची चौकशी समितीने चौकशी करणे. बाबत निवेदन सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांच्या वतीने उप विभागीय अधिकारी अंबड यांना देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत मंडल अधिकारी संदीप नरूटे यांची चौकशी करण्याबाबतचे आदेश अंबड तहसीलदार यांना देण्यात आले आहे.आता हे पाणी औचित्याचे ठरणार आहे की, अंबड तहसीलदार शासकीय नियमाची पायमल्ली करणारे संदीप नरूटे यांची नियमानुसार चौकशी करतात का त्यांना पाठीशी घालतात? सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांनी इशारा दिला आहे की, आपल्या पदाचा गैरवापर करत नियमबाह कार्यप्रणाली असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची योग्य ती चौकशी न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.








