तुकाराम पांचाळ ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद दि. 27नांदेड जिल्ह्याचे लोक कल्याणकारी शेतकरी नेते मा.श्री मारोतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरुजी संस्थापक चेअरमन व्ही.पी.के. उद्योग समूह यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. पूजाताई मारोतराव पाटील कवळे / जाधव संचालिका व्ही.पी.के. उद्योग समूह* यांच्या सुयोज्य नियोजनातून चालू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल उमरी च्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी छावा चित्रपट दाखवन्यात आला, या चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील शौर्यगाथेची माहिती मिळाली.छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळाली, या चित्रपटातून विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याच्या इतिहासाची ओळख झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली, याने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.छावा हा चित्रपट अंगावर शहारे येतील आशा पद्धतीने बनवण्यात आला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना तो बघायला आवडला. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना दाखवल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांना त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीची माहिती मिळाली, छावा चित्रपट दाखवण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची थोडक्यात माहिती दिली. चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी चित्रपटावर चर्चा केली, ज्यामुळे त्यांना चित्रपटातील महत्त्वाचे मुद्दे समजले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, यात श्री टेकुलवार सर, श्री वाघमारे सर, श्री पांचाळ सर, श्री आकाश हैबते सर, श्री माधव हैबते सर, श्री उमेश सर, सौ. हिवराळे मॅडम, सौ. इंगळे मॅडम, सौ. लोध मॅडम, सौ. कदम मॅडम, सौ. कोमलवार मॅडम, सौ. हंबर्डे मॅडम, कु नागलवाड मॅडम, कु.गाडे मॅडम उपस्थित होत्या.


