महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.27:-महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून भद्रावती येथील साई नगर इथे वॉर्डातील शिवभक्ताद्वारे शिवलिंग स्थापना सोहळा विभागाचे आमदार करन देवतळे, तसेच शिवसेना शिंदे गट नवनियुक्त लोकसभा क्षेत्र प्रमूख मुकेश जीवतोडे यांचे प्रमूख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने दिनांक २ रोज रविवारी जगन्नाथ मंदिर, शिवाजी नगर ते साई नगर भव्य कलश धारी महीला व भजन मंडळीभव्य मिरवणूक, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत होम हवन व शिवलिंग स्थापना उत्सव, सायंकाळीं संगीतमय कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रमोद सोनटक्के, दिनेश मासिरकर, प्रवीण झाडे, प्रशांत डाखरे, समाधान हनुमंते, मनोज काळे यांनी केले आहे.








