सागर शेळके
शहर प्रतिनिधी कोल्हापुर
स्वर्गीय भास्करराव गोपाळराव कुलकर्णी यांनी वयाच्या 98 व्या वर्षी देहदान करून समाजासाठी आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या पुण्यकर्मामुळे समाजात देहदानाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि अनेकांना प्रेरणा मिळेल; आमदार संजय उपाध्याय व माजी आमदार नीलाताई देसाई यांच्या विशेष उपस्थितीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे; पर्व सामाजिक संस्था व योगदान पोर्टल न्यूज यांच्या सहकार्याने देहदान चळवळीला समाजात वेगळे स्थान मिळाले आहे; त्यांच्या कुटुंबीयांचा विशेषतः कन्या कल्पना सकपाळ, जावई मारुती सपकाळ, नातू डॉ. सुबोध सकपाळ, विनोद डावरे, तसेच सहकार्य करणारे डॉक्टर्स आणि इतर सहकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे; भास्करराव कुलकर्णी हे 1 मार्च 2025 रोजी 99 व्या वर्षात पदार्पण करणार होते; त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्याऐवजी कुटुंबीयांनी व सामाजिक संस्थांनी शोकसभा न घेता अवयवदानाच्या महत्त्वावर आधारित प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून, पर्व शैक्षणिक विश्वस्त संस्था व योगदान पोर्टल कोल्हापूर यांच्या वतीने अवयवदान जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, रोटो व सोटोच्या मुख्य समन्वयक सुजाता अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे; भास्कररावांच्या पुण्यस्मृतीने हजारो लोकांना देहदानासाठी प्रेरणा मिळेल आणि समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण होईल.


