सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024-25 अंतर्गत छाजेड प्राथमिक विद्यालय, नांदगाव येथे पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात पंचायत समिती नांदगावचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, शालेय पोषण आहार अधीक्षक सुरेश. सोनवणे आणि संगणक ऑपरेटर श्री. भले यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत नांदगाव तालुक्यातील 13 शाळांमधील स्वयंपाकी मदतनीसांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना अधिक पोषक, रुचकर आणि संतुलित आहार मिळावा, तसेच शालेय पोषण आहारात विविधता यावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंपाकी मदतनीसांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात तीन उत्कृष्ट पाककृतींना विशेष पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेमुळे शालेय पोषण आहार अधिक गुणवत्तापूर्ण व आकर्षक करण्यास मदत होईल, असे मत गटशिक्षणाधिकारी श्री. चिंचोले यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सुनिता जाधव केंद्रप्रमुख शिवाजी तुरकुणे,काटकर परिक्षक नुतन मुळणकर , कल्पना अहिरे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि आहाराच्या गुणवत्तेसाठी असे उपक्रम नियमित राबवण्याची आवश्यकता असल्याचे उपस्थित मान्यवरांनी प्रतिपादन केले सुत्रसंचलन संजीव वाघ यांनी केले.








