मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
प्रतिनिधी / १ऑगस्ट
हिवरखेड :- येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघाच्या वतीने एच एस सी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.हिवरखेड शहरातून पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार घेण्यात आला व महामानव प्रसिद्ध साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून लोकमान्य टिळकांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कु. रुपल संदीप वालचाळे ही प्रथम येऊन हिने दहावीच्या परीक्षेत ९९.४०टक्केवारी मिळविली आहे तर शहरात दुसरा येऊन कुणाल गणेश इंगळे याने ९९.२० एवढी टक्केवारी मिळविली आहे कु अनुश्री गोवर्धन गावंडे हिने तिसरा क्रमांक पटकावला असून तिला ९८.४० एवढे गुण मिळविले आहेत कु.उत्कर्षा सुभाष बोळे हिचा चवथा क्रमांक आला असून तिला ९६.६० गुण मिळाले आहेत तर क्रमांक पाच वर राहून कु. रुचिका विनायक गोमाशे हिने ९६.२० एवढे गुण मिळविले आहेत या पाचही विद्यार्थ्यांनी गावचे नावलौकिक केल्यामुळे त्याचा पत्रकार भवन येथे यथोचित सत्कार घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संदीप इंगळे हे होते तर प्रमुख उपस्तीतीत राजेश पांडव पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खिरोडकार, धीरज बजाज,जितेश करिया, उमर मिर्झा, अनिल कवळकार, राहुल गिर्हे,सुरज चौबे, जावेद खान तसेच पालक गणेश इंगळे, संदीप वालचाळे, गोवर्धन गावंडे, विनायक गोमाशे श्रीमती बोळे,पंकज इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कवळकार तर आभार धीरज बजाज यांनी मानले.