योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – १ आँगस्ट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचा १०१ व्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र सांगली जिल्हा कमिटिच्या वतीने आयोजित केलेल्या आँनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम प्राचार्य सुरेश कुराडे सर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर रित्या संपन्न झाला. सांगली जिल्हाचे नाव संपूर्ण जगभर पोहचविण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. तेच महान साहित्यिक आजच्या युवापिढीला समजणे फार गरजेचं आहे. या उद्देशाने सांगली जिल्हा ने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रकाश नाईक यानी खर्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक क्षेत्रातील कार्य म्हणजे दिपस्तंभा प्रमाणे हे समजावून सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ. रामदास नाईकनवरे यांनी अतिशय मार्मिक शब्दात करून दिला, शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर ची घोडदौड आणि उत्तम कार्यावर प्रकाश टाकला. तर उद्घाटन मनोज जाधव, सुनिल सुरेखा यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिलकुमार सकटे, चिंचोलकर यांनी आपल्या ओघवत्या शब्दात केले तर अध्यक्षणीय भाषणात प्रा.सुरेश कुराडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेऊन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगली टिमला धन्यवाद दिले. तर कार्यक्रमाला उपस्थित असणारे ग्राफिक्सकार जितेंद्र मोहिते चंदपूर जिल्हाध्यक्षा भावना खोब्रागडे कोकण विभागीय सचिव रिया पवार यवतमाळ जिल्हाध्यक्षा कांचन मून आणि संपूर्ण उपस्थितीत मान्यवरांचे आभार सांगली जिल्हाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी आभार व्यक्त केले. खरतरं अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास. तुम्ही आम्ही समजावून घेणे फार गरजेचं आहे. सांगली जिल्हा कमिटीने छान आणि सुंदर विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करून एक नवा आदर्श निमार्ण केल्या बदल. राज्यकमिटिच्या वतीने सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.