रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागांव : तालुक्यातील वाकान येथे अॅग्री स्टॅग बाबत प्रचार प्रसिद्धी दरम्यान सर्व शेतकऱ्यांना कृषी सहायक, वाघमारे व इतर कृषी कर्मचारी यांचे मार्फत प्रचार प्रसिद्धी बाबत आव्हान करन्यात आले सर्व शेतकऱ्यांना कळवीन्यात आले आहे.तालुक्यातील ई पीक पाहनीचे प्रलंबित कामकाज आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी,यांचे सहायक मार्फत करण्यात येत आहे.व शेवटची तारीख २८ फेब्रुवारी आहे.करीता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहनी झाली नसेल अशा शेतकऱ्यांनी ती सहायक व्दारे करून घेण्याचे आव्हान यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी केले.तसेच अॅग्री स्टॅग अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक नोंदणी, नजीकच्या आपले सहकार सेवा केंद्र येथे सुरू आहे.प्रत्येक शेतकऱ्यांना अॅग्री स्टॅग फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) काढणे अनिवार्य आहे.असे यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करन्यात आले.शेतकऱ्यांनी अॅग्री स्टॅग अंतर्गत फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र क्रमांक) न काढल्यास यापुढिल काळात शेतकऱ्यांना पी.एम.कीसान योजना,पीक विमा, नैसर्गिक आपती अनुदान,पीक कर्ज व इतर शासकीय योजनेचे लाभ घणेसाठी हि नोंदनी आवश्यक आहे.नोंदनी न केल्यास शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनेंचा लाभ मिळणार नाही.असे अॅग्री स्टॅग प्रचार प्रसिद्धी दरम्यान शेतकऱ्यांना कळवीन्यात आले.शेतकरी ओळखपत्र काढन्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, व शेतीचा गट क्रमांक माहित असणे गरजेचे आहे असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करन्यात आले यावेळी कृषी सहायक वाघमारे,माजी सरपंच गणेश राठोड,माजी सरपंच मदन पवार, शेतकरी प्रकाश खटारे, हेमंत राठोड , निळकंट पवार,रत्ना पवार, ज्ञानेश्वर खटारे, हरिचंद राठोड,निकेश कुरकुटे, रामराव माहुरे,यासह आदी शेतकरी उपस्थित होते.


