केशव सातपुते
ग्रामीण प्रतिनिधी लोणार
किनगाव जटूटू पासून जवळच असलेल्या लिंगा या गावा मध्ये प्राचीन शिवमंदिर असून यामध्ये प्राचीन शिवलिंग आहे लिंगा येथील शिवमंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्र निमित्त गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते दररोज नामांकित कीर्तनकारांनी आपल्या वाणीतून परमार्थाचे बोल सांगितले २८ वर्षापासून चालत आलेली ही अविरत परंपरा गावकरी आजही जोपासत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पाच वाजता येथील नागरिक प्रल्हाद लांडगे यांच्या हस्ते रुद्र अभिषेक व आरती करून दर्शनाला सुरुवात झाली दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गावकऱ्यांच्या वतीने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती महाशिवरात्रीच्या दिवशी आलेल्या सर्व भक्तांना साठी येथील नागरिक प्रल्हाद जायभाये यांच्या वतीने चहा व R.O पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मंदिर परिसरात भव्य यात्रा भरवली जाते या यात्रेमध्ये व्यापारी आपले दुकाने मोठ्या थाटात लावतात तर यात्रेसाठी आलेले भाविक सामान खरेदीचा आनंद लुटतात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...


