संजय शिंदे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- २०२२ करीता घोषित करण्यात आलेल्या ५ पोलीस ठाण्यांना तसेच केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सन २०२३ करीता व सन २०२४ करीता वार्षिक पोलीस ठाण्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून घोषित केलेल्या २ पोलीस ठाण्यांना दि. ०१/०३/२०२५ रोजी पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर येथे होणा-या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या गुन्हे परिषदेमध्ये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावचे सुपुत्र मा.नामदेव विठ्ठल बंडगर कासा पोलीस ठाणे जिल्हा पालघर येथील कार्यकाळात उत्तम संघटन व वेळेच मार्गदर्शनामुळे पालघर जिल्हा पोलीस दलाचा उत्तम प्रकारे कायापालट केला तसेच जनमानसात पोलिसांची प्रतिमा उंचावली गेली असल्याने सदरचा पुरस्कार वितरण समारंभ दि. ०१/०३/२०२५ रोजी केंद्रीय गृह मंत्रालय तर्फे सन 2024 करता चा महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये बंडगर यांनी केलेल्या कामाचे कौतुक त्यांच्या मूळ गावी पोंधवडी येथून ग्रामस्थ व नागरिक कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.











