सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील बेळकोणी (बु) या गावात गावातील कष्टकरी,शेतकरी, शेतमजूर विद्यार्थी व सुशिक्षित समाज बांधवांच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी सी. सी.कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यासाठी बेळकोणी गावातील सर्व समाज बांधवांनी आपल्या परीने आर्थिक सहकार्य केलेले आहे. यापुढे नालंदा बुद्ध विहार परिसरासह विहारा समोरील व आजूबाजूचा सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत असणार आहे.











