राजपाल बनसोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : गेल्या पंधरा वर्षापासून दिग्रस पंचायत समिती कार्यालयासमोर अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जनसंपर्क कार्यालय होते. या कार्यालयामध्ये अपंगाचे अनेक प्रश्न सोडविले जात होते. परंतु दिग्रस नगर परिषद चे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांना या प्रकारची नोटीस न देता जेसीबी चा हातोडा चालून अपंगाचे कार्यालय उध्वस्त केले आहे. अपंग जनता दल सामाजिक संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी आरोप केला की, मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या दादागिरीमुळे अपंगांचे कार्यालय हटविण्यात आले आहे. जोपर्यंत दिव्यांग पाच टक्के निधीमधून नुकसान भरपाई मिळत नाही आणि दिग्रस नगरपरिषद चे मुख्याधिकारी अतुल पंत त्यांच्यावर 3 मार्च 2025 पर्यंत दिव्यांग कायदा 2016 नुसार गुन्हा दाखल झाला नाही तर 4 मार्च 2025 पासून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामुहिक उपोषण करणार असल्याचा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी व पोलिस अधिकारी यवतमाळ तसेच दिग्रस चे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे अर्ज दिला आहे.


