सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून काही अंतरावर असलेल्या मौजे हरनाळी येथील दलित वस्ती मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कसल्याच प्रकारची टंचाई नसून दलित वस्तीमध्ये मुबलक पाण्याची चांगल्या प्रकारची सोय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथील दलित वस्ती मध्ये सरपंच साहेबराव पाटील शिंदे यांनी स्वतःच्या खिशातील पैशातून बोअर मारून दिले होते.पण त्या बोअरवेल ला पाणी न लागल्यामुळे त्यांनी त्यांच्या जागेमध्ये आणखी दुसरे बोअर मारून त्या बोअरवेलचे पाणी दलित वस्तीच्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले असून या पाण्यासाठी कुठल्याच प्रकारचे कर आकारत नाहीत. किंवा दलित वस्तीतील नागरिकांना पाणी भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची आडवणूक सुध्दा करत नाहीत. पण गावातील काही लोकांकडून कुठलेच कारण नसताना केवळ फक्त विरोधाला विरोध म्हणून मौजे हरनाळी येथील सरपंच साहेबराव पाटील शिंदे यांची बदनामी व्हावी या उद्देशाने व गावातील वातावरण दूषित करण्याचे काम करीत असल्यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदन बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर शेषेराव शिंदे,सदानंद शिंदे,राजेश शिंदे, लक्ष्मण वाळवे,नागेश वाळवे,
प्रशांत वाळवे,गंगाधर वाळवे,
हानमंत भंडारे,ज्योतीबाई भंडारे,कोंडिबा शिंदे,मोगलाजी जलदेकर,दिलीप शिंदे,
भिमराव पाटील शिंदे,मरिबा होरके,पोशट्टी जलदेकर,हानमंत जलदेकर,खाकु जलदेकर,
मक्काजी जलदेकर,शिवकुमार भंडारे,सायबू जजगेकर,सायबू जलदेकर,पिराजी जजगेकर, सुर्यकांत शिंदे,जीवनराव शिंदे,अंजनाबाई होरके,
चंद्रकलाबाई शिंदे,मारोती शिंदे,मारोती जलदेकर,शंकर होरके,हानमंत शिंदे,मोहन जलदेकर,मारोती जलदेकर,पिराजी शिंदे,
अरुणाबाई जलदेकर,कांताबाई जेजगेकर,किशोर शिंदे,शंकर भंडारे, बालाजी जजगेकर,
शंकर होरके, नितीन शिंदे,बालाप्रसाद जलदेकर,मोगलाबाई भंडारे आदींच्या साक्षऱ्या निवेदनावर आहेत.
चौकट मध्ये लावा
मौजे हरनाळी/ममदापूर गट ग्रामपंचायत येथील सरपंच साहेबराव पाटील शिंदे यांनी गावांमध्ये एकुण आठ बोअर स्वतःच्या खिशातील पैशातून मारले असुन त्यामध्ये दलित वस्ती मध्ये सुद्धा बोअर मारले होते.पण त्या बोअरवेल ला पाणी लागले नसल्यामुळे दुसरे बोअर त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये मारले असून त्या बोअरचे पाणी येथील दलित वस्तीमध्ये देण्यात येत आहे.तरी पण सध्या गावातील काही लोकांकडून सरपंच साहेबराव पाटील शिंदे यांची जाणून बुजून बदनाम करण्याचे काम चालू असल्याचे प्रतिक्रिया हरनाळी येथील दलित वस्तीतील नागरिकांनी दिली आहे.

