मनीष ढाले
ग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी
नुकतीच फुलसावंगी येथे पत्रकार संघाची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यामध्ये सर्वानुमते तानाजी शिंदे यांची अध्यक्ष, सद्दाम शेख यांची उपाध्यक्ष तर बाळु राठोड यांची सचिवपदी निवड करण्यात आली. येथे दर वर्षी नविन पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात येते. त्या अनुसंघाने पत्रकारांची बैठक घेण्यात आली. महागाव तालुका पत्रकार संघटनेचे आधारस्तंभ रितेशभाऊ पुरोहित व अध्यक्ष महेश कामारकर यांच्या मार्गदर्शनात न्यू फुलसावंगी पत्रकार संघटनेची नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी तानाजी शिंदे यांची अध्यक्ष सद्दाम शेख यांची उपाध्यक्ष तर बाळु राठोड यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार शेर खान पठान, विजय पाटील, बंटी पठान, मनीष ढाले, शिवप्रसाद डोंगरे, अजय पांचगे व रितेश जयस्वाल उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

