सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (MANS) बैठक नांदगाव येथील अमरधाम (स्मशानभूमी)
येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यात आली मात्र बैठकीसाठी ठिकाण हे नांदगावची स्मशानभूमी ठरवण्यात आले होते. स्मशान भूमीमध्ये जाऊन उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. व याठिकाणी अंनिसच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास अण्णा मोरे होते . यावेळी अध्यक्षपदी प्रा. सुरेश नारायणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वास्तविक संपूर्ण कार्यकारणी बिनविरोध झाली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून देविदास मोरे व भगीरथ जेजुरकर यांची देखील निवड करण्यात आली. कार्यकारणीत यावेळी खालील प्रमाणे विविध मुद्द्यांना हात घालण्यात आला. बैठकीस ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते मारुती जगधने आणि प्राध्यापक सुरेश नारायणे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (MANS) ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संघटना आहे, जी अंधश्रद्धा, जादूटोणा, भूत-खेत यांच्या गैरसमजुतींविरुद्ध कार्य करते. या समितीने वेळोवेळी समाजातील अंधश्रद्धांविरुद्ध विविध उपक्रम राबवले आहेत
MANS ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी संघटना असल्याने, समाजात प्रचलित भूत-प्रेत, आत्मा, पुनर्जन्म यांसारख्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीशील उपक्रम राबवते. अशा उपक्रमांपैकी
हे उपक्रम घेण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये अशी भीती असते की, रात्री स्मशानात गेल्यास भूत, आत्मे त्रास देतील. ही भीती दूर करण्यासाठी MANSचे कार्यकर्ते स्मशानात जाऊन रात्रीच्या वेळेस चर्चा करतात आणि लोकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष अनुभव घेतात.
काही लोक मृत आत्मे पुन्हा परत येतात किंवा भुते त्रास देतात असे मानतात. अशा गैरसमजुती दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा केली जाते.काही ठिकाणी अघोरी प्रथा, जादूटोणा किंवा अन्य अंधश्रद्धा चालू असतात. त्यांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी पुढाकार घेते.तसेच माध्यमांद्वारे समाजात जागरूकता निर्माण करते.
बैठक रात्रीच्या वेळी स्मशानात घेतली जाते.MANSचे कार्यकर्ते आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले लोक उपस्थित राहतात.अंधश्रद्धा आणि त्यावरील वैज्ञानिक स्पष्टीकरण यावर चर्चा होते.
काही वेळा सामान्य लोकांना सहभागी करून घेतले जाते, जेणेकरून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी अशा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.अनेक गावांमध्ये ही चळवळ नेऊन लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.MANSचे स्मशानभूमीत बैठक घेणे हा समाजाच्या अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग आहे. यामुळे भीती दूर होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो. महाराष्ट्रात यामुळे अनेक लोकांचे अंधश्रद्धांवरील विश्वास कमी झाले आहेत.म्हणुनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नांदगाव येथील स्मशानभूमीत बैठकीचे आयोजन करण्यात आले.व या बैठकीमध्ये खालील नांदगाव अंनिसची कार्यकारणी निवडण्यात आली. ती पुढील प्रमाणे –
अध्यक्ष – प्रा.सुरेश नारायणे उपाध्यक्ष:- देवीदास मोरे, भगिरथ जेजूरकर कार्याध्यक्ष:- प्रभाकर निकुंभ ( सर्पमित्र)अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका कार्यवाह:- मारुती जगधने
प्रधान सचिव:- प्रज्ञानंद जाधव
बुवाबाजी संघर्ष:- मंगेश आहेर ( सर्पमित्र) वैज्ञानिक जाणिवा:- संजय कांदळकर विविध उपक्रम विभाग:- किरण भालेकर
जोडीदार विवेकी निवड कार्यवाह:- गणेश शर्मा राष्ट्रीय समन्वयक:- राजाभाऊ पवार ,बंडुबाबा निकम
विज्ञान बोध वाहिनी:- राजू जाधव व विशाल पवार प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग:- प्रा.विक्रम घुगे, मोहसीन बेग विवेक जागर प्रकाशन कार्यवाह:- राजेंद्र गुढेकर
सोशल मिडिया:- संदिप जेजूरकर
आदींची निवड यावेळी करण्यात आली.यावेळी प्रज्ञानंद जाधव व मंगेश आहेर यांनी या ठिकाणी काही चमत्कारावर आधारीत प्रयोगांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले . यावेळी बैठकीला पत्रकार, डॉक्टर, वकिल, सर्पमित्र,शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

