मनोज बिरादार
ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
देगलूर :-
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाची राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत दिले जाणारे विविध पुरस्कार नुक़तेच जाहीर झाले असून करिअर कट्टा उपक्रमाची देगलूर महाविद्यालयात उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यामूळे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ. मोहन खताळ यांना जाहीर झाला आहे.
प्रस्तुत पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येनार असल्याचे महाराष्ट्र राज्य करिअर कट्टा विभागाने कळविले आहे.
‘करिअर कट्टा’ हा महाराष्ट्र शासनाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करवून विद्यार्थ्याला सक्षम बनविनारा अभिनव उपक्रम असून या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आय ए एस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला या दोन योजना राबविल्या जात असून सदरील योजना प्राचार्य डॉ मोहन खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा पूर्व तयारीसाठी विविध उपक्रम अतिशय उत्तमपणे राबविल्या आहेत.
विशेष महत्वाची बाब म्हनजे महाराष्ट्र शासनाने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रासही देगलूर महाविद्यालयास मान्यता दिली असुन डॉ. नीरज उपलंचवार व प्रा. हाके यांच्या मार्गदर्शनाख़ाली पोलिस भरतीसाठी तयारी करुण घेतली जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करिअर कट्टा कक्षाची स्थापना, करिअर कट्टा आर्थिक साक्षरता कार्यशाळा, विद्यार्थी करिअर संसद, स्पर्धा परीक्षा व करिअर कट्टाचे टेलिग्राम चॅनल, एम्प्लॉयमेंट न्यूज बोर्ड, अधिकारी वर्गाचे विशेष व्याख्याने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यासवर्ग, खुली सामान्य ज्ञान परीक्षा, प्रश्न मंजूषा रोजगार मेळाव्याचे आयोजन, प्लेसमेंट सेल , यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा बारामती येथील करिअर संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांचा सहभाग इत्यादी असे अभिनव उपकम महाविद्यालयात राबविले जात आहेत.
त्याची दखल घेउन महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टाअंतर्गत उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ खताळ याना जाहीर केला आहे. महाविद्यालयास प्राप्त झालेल्या पुरस्काराबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,
उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे, सूर्यकांत नारलावार, , गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर, गोविंदप्रसाद झंवर यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार उपप्राचार्य एम एम चमकुडे, उपप्राचार्य डॉ व्ही जी शेरीकर , पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील ,
करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉ माधव चोले व डॉ सुरेश काशीदे, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे