मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
शैक्षणिक,सामाजिक आरोग्य, सांसकृतिक,क्रीडा या क्षेत्राबरोबरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सन २०१८ सालापासून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या वाळवटी एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘शिक्षक रत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.रविवार दि. २फेब्रूवारी रोजी पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष विनायक पारधी यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीवर्धन तालुक्याचे माजी गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष अनिल भूसाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान हायस्कूल वाळवटी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रीवर्धन तालुक्यातील १३ प्राथमिक व ४ माध्यमिक शिक्षकांचा ‘शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.बोर्लीपंचतन येथील रा.जि.प.कन्या शाळेचे मुख्याध्यापक दिपक खोत यांनी २०२४/२५ या वर्षात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माजी गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं.ट्रस्टच्या वतीनं गुणवत्ता वाढीसाठी प्रेरित होऊन तालुका गुणवत्ता विकास अधिक वेगाने व्हावा यासाठी प्रत्येक केंद्रातून एक प्राथमिक शिक्षकाचा त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात येतो.त्याचबरोर ट्रस्टचे इतर क्षेत्रातील कामही उल्लेखनीय आहे.असेच कार्य त्यांच्या मार्फत सदैव घडत राहो असं प्रतिपादन नवनाथ साबळे यांनी केलं व त्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी रानवली सरपंच सुरेश मांडवकर, शेखाडी सरपंच बबन पाटील, पंचक्रोशी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय मोरे,राजेंद्र तोडणकर,मंत्री भरत गोगावले यांचे स्वीय सहायक राजू जाधव, किसान हायस्कूल वाळवटीचे मुख्याध्यापक सिध्देश्वर गरांडे, हरेश्र्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश चौधरी, ओमंडळाचे सदस्य जगन फडणीस,सुरेश गजमल,समीर वाळवटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.ट्रस्टचे अध्यक्ष भिकू पांगारकर यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचं अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
‘शिक्षक रत्न’ पुरस्कार प्राप्त शिक्षक
- रश्मी राजेंद्र साखरकर – प्राथमिक शाळा साखरी
- अनुजा गजेंद्र भुसाणे – प्राथमिक शाळा रानवली
- दिपक नथुराम खोत – प्राथमिक कन्या शाळा बोर्ली पंचतन
- श्रध्दा संदेश नागे -श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्रं.६
- संजय दत्तात्रय बिरादार -प्राथमिक शाळा आदगाव
- फिरोज नजरुद्दिन कोल्हापुरे – शेखाडी उर्दू शाळा
- बालाजी उद्धवराव जाधव -प्राथमिक शाळा जसवली
- महावीर अशोक बुबने – प्राथमिक शाळा हरेश्र्वर
- निखिल नागेश पानवलकर – प्राथमिक शाळा बापवली
- प्रल्हाद चिंतामण बागुल – प्राथमिक शाळा कारिवणे
- राजेंद्र देवराम वाघमारे – प्राथमिक शाळा बोर्ले
- समाधान शहाजी चोरमाले – प्राथमिक शाळा दिघी
- समीर सय्यद-प्राथमिक शाळा पनवेल
- जयश्री सुनील पाटील – दांडगुरी हायस्कूल
- योगिता नरेश नाथजोगी-
किसान हायस्कूल
वाळवटी - योगेश पांडुरंग तुरे- हरेश्र्वर हायस्कूल
- सुधीर चमनलाल राऊत – र.ना.राऊत हायस्कूल श्रीवर्धन


