मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली:- इतर समाजाच्या तुलनेत मादगी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे या समाजाचा आर्थिक , सामाजिक व राजकीय विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही.बदलत्या काळानुसार मादगी समाजातील विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेऊन केवळ नौकरीच्या मागे न लागता व्यवसायिक शिक्षणाची कास धरून संघटित होण्याची गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मादगी समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मोहन देवतळे यांनी केले.
अखिल भारतीय मादगी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चामोर्शी येथील सांस्कृतिक सभागृहात १ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय मादगी समाज परिषद घेण्यात आली त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून अखिल भारतीय मादगी समाज संघटना प्रदेशाध्यक्ष रुपचंद लाटेलवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश संघटक गोविंदा कमेरवार, पोर्ला ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी दिगांबर लाटेलवार, डॉ.प्रा. पूनम घोडमोडे.अँड सोनाली मेश्राम,चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार, सावली तालुका अध्यक्ष रमेश लाटेलवार, यशोधरा विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके, आजाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष राज बनसोड, विनोद मडावी, चामोर्शी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, प्रदेश महीला संघटीका नीलिमा बोलीवार, भोगनबोडीचे पोलिस पाटील खुशाबराव चेन्नुरवार उपस्थित होते. मोहन देवतळे पुढे बोलताना म्हणाले की मादगी ही जात अनुसूचित जातीमध्ये ३५ व्या क्रमांकवर आहे. या जातीचा पिढीजात व्यवसाय डबघाईला आला असून समाजातील मागासलेपणाचा स्तर उंचावण्यासाठी काहीजण स्वउद्योग करीत आहेत.मात्र पिढीजात व्यवसायपुरते मर्यादित न राहता चांगले शिक्षण घेऊन आपला समाज दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन देखील याप्रसंगी केले .कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व संविधान वाचन करून करण्यात आली .कार्यक्रमाप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत समाजबांधवांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदा कामेरवार यांनी केले तर संचालन गजू आलेवार व संघरत्न निमगडे यांनी केले तर आभार निलिमा बोलीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मनोज मेश्राम,अविनाश तोटपल्लीवार,आबाजी दासरवार,ऋषी गोरडवार.दूशांत पौरकार,अनिल देवतळे.राजेंद्र चनेकार,विजय चंदावार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने मादगी समाजबांधव उपस्थित होते.


