दि वाल्मिकी मच्छी पालन संस्थेचा उपक्रम
मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :- दी वाल्मिकी मच्छी पालन सहकारी संस्था रजी क्रं ३४६ यांच्या वतीने २० मच्छीमारांना लाईफ जॅकेटचे वाटप संस्थेचे अध्यक्ष देवराव वाघाडे यांच्या हस्ते करण्यात आले.नदी, तलाव,बोडी आदी जलस्त्रोतांच्या ठिकाणी मच्छीमार हे मासेमारीसाठी जात असतात. बुजुर्ग सोडले तर बऱ्याच युवक मच्छीमारांना पोहण्याचा फारसा अनुभव नसतो. नदी,तलाव किंवा बोडी या ठिकाणी नावेवरून मासेमारी करीत असताना नावेत पाणी घुसल्यास नाव पालटून नावेवरील मच्छीमार पाण्यात बुडून मच्छिमारांचा जीव जाण्याची शक्यता असते. लाईफ जॅकेट हे मासेमारीसाठी संरक्षण कवच आहे. जॅकेटसह पाण्यात बुडल्यानंतर जॅकेट फुगून ते तरंगत असते .१२० किलो वजन सहज पकडते व बुडण्यापासून मच्छीमारांचे संरक्षण होते. कुनघाडा रै येथील दि वाल्मिकी मच्छी पालन सहकारी संस्थेत एकूण ९ सदस्यांची कार्यकारिणी असून, जवळपास ४५० ते ५०० सभासदांचा समावेश आहे. त्यातील २० सभासदांचा एक गट तयार करून कुनघाडा रै – नवेगाव बांध तलाव ठिकाणी लाईफ जॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित सभासदांना टप्याटप्याने जॅकेटचे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देवराव वाघाडे, संचालक बंडू कस्तुरे यांनी दिली आहे. यावेळी संस्थेचे सभासद सुनील वाघाडे, इंद्रजित मेश्राम,निलेश मेश्राम, देवराव भोयर,किशोर भोयर,दयाळ मेश्राम, दीपक कलसार,नेताजी वाघाडे, सखाराम गेडाम आदी मच्छीमार उपस्थित होते.


