संदेश ऊखळकर,
रिसोड शहर, प्रतिनिधि.
रिसोड तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानाला निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा केला जात असून धान्य पुरवठा करणाऱ्या यंत्रणेची चौकशी करुण त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ता.2 आगस्ट रोजी वंचित बहुजन अघाड़ी तालुका रिसोड पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने रिसोड तसहीलदार यांना निवेदन देवून करण्यात आली
स्वस्त धान्य दुकानाला होत असलेला धान्य पुरवठा मध्ये भष्ट्राचार होत असून गहु, तांदुळ , दाळ याचा सड़का वास् येत असून निकृष्ट दर्जाचे असल्या करनाने खाण्याच्या योग्य नसल्याने गोरगरीब जनतेच्या आरोग्यस धोका निर्माण झाला आहे
या अनुसंगाने ता.9आगस्ट रोजी एक दिवसीय अन्यत्याग उपोसन आंदोलन रिसोड तहशील कार्यालया समोर शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. स्वस्त राशन दुकानाला उत्कृष्ट दर्जाचे धान्य देण्यात यावे, सबधित विभागातील अधिकारी, कर्मचारी चौकशी करुण कार्यवाही करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन अघाड़ी रिसोड तालुका यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे











