गणेश वाघ
ग्रामीण प्रतिनिधी कसारा
न्यायलयीन प्रलंबित असलेल्या कसारा गावातील सम्शानभूमीच्या भूमिपूजनाला दहा वर्षानंतर मुहूर्त मिळाला असून लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून कसारा गावातील तसेच कब्रस्तान यांची अवस्था खूपच बिकट होती.त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागतं होते.मोखावणे-कसारा ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश वीर यांनी या समस्या मार्गी लावल्या असून धावडे बाबा येथील सम्शान भूमिला 5लाख चा निधी मंजूर झालेला आहे. आज या सम्शानभूमीचा भूमिपूजन गावातील सर्व राजकीय पक्ष तसेच सर्व नागरिकांनी मिळून सम्शानभूमीच्या भूमिपूजनाची सुरुवात केली. या वेळी सरपंच -प्रकाश वीर, उपसरपंच- शरद वेखंडे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्तिथ होते.