शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
पिंप्री खुर्द येथील श्री तुकाराम सिरसाठ विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील खेळाडू साई प्रल्हाद घोलप याची कबड्डी या प्रकारात राष्ट्रीय स्तरावर नुकतीच निवड करण्यात आली असून या प्रकारातील बहुतेक तालुक्यातून ही निवड प्रथमच होत आहे त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे
सन 2024 25 या वर्षात आयोजित 68 वी राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धा 14 वर्षे वयोगट ही दिनांक दहा ते बारा डिसेंबर 2024 ला अमरावती येथे आयोजित करण्यात आली असून याकरिता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरा करता उपस्थित राहण्यासाठी नुकतेच विभागीय संचालक कार्यालय क्रीडा व युवक सेवा अमरावती यांचेकडून विद्यालयास पत्र प्राप्त झाले असून यासाठी साई प्रल्हाद घोलप यास तातडीने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे साई घोलप याची राष्ट्रीय स्तर शिबिरा करता निवड झाल्यामुळे हा केवळ शाळेचा नव्हे तर तालुक्याचा बहुमान आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे संचालक श्री पंजाबराव शिरसाठ व श्री मनीष जी कर्णावत यांनी व्यक्त केली आहे याआधी सुद्धा विद्यालयाचे खेळाडू सार्थक नागोराव गावंडे व श्याम गोपाल पडोळे यांची जिल्हा असोसिएशन मार्फत राज्यस्तरावरील शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक श्री योगेश काळे सर व मुख्याध्यापक श्री अनंत सपकाळ सर यांना देतात या यशाबद्दल श्री गजानन कुटेकर, श्री सुरेश रोहनकर, श्री संजय खंडारे ,कु. माधुरी सुर्वे, कु. पूजा धर्माळे ,कु. भारती मगर व सौ. कविता खोटरे व श्री. लक्ष्मण भेंडे यांनी कौतुक केले आहे.