सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार प्रकरणी या सन २०२५ ते २०१७ या कालावधीत जलयुक्त शिवार योजनेत काम करणाऱ्या गुत्तेदारांविरूध्द फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या सात वर्षांत सन २०१५ ते सन २०१७ या वर्षात बीड जिल्ह्यातील अनेक भागात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. परळी वैजनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती या योजनेत मोठा अपहार झाला होता. याप्रकरणात १८ लाख २७ हजार ८०२ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात दि. २ डिसेंबर २०२४ रोजी २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. या २४ जणांविरुद्ध जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामात कंपार्टमेंट बंडींग, माती नाला बांधकाम, सिमेंट नाला बांधच्याशासकीय कंत्राटी कामामध्ये बनावट आणि खोटे दस्तऐवज यांचा वापर करून शासनाला चुना लावत ८ लाख २७ हजार ८०२ अपहार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी परळी वैजनाथ तालुक्याचे कृषीधिकारी विष्णू मुंडे यांनी परळी वैजनाथ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यामध्ये अंबाजोगाई , लोखंडी सावरगाव, परळी वै.,माजलगाव ,अस्वलअंबा,नंदागौळ, सारणी, वानटाकळी, सोनहिवरा, इत्यादीसह अनेक ठिकाणच्या मध्यवर्ती सहकारी संस्थेचे सचिव आणि गुत्तेदार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी गेल्या काही वर्षांत जलयुक्त शिवार प्रकरणी जिल्ह्यातील गुत्तेदारांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करून दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचारी, गुत्तेदार यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात आली होती.