पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड : सुनीलजी चव्हाण जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी ग्रामपंचायत अंधानेर ला भेट देऊन कोविड19 लसीकरण मास्क वापरणे हात धुणे सामाजिक अंतर पाळणे व स्वच्छतेवर लक्ष देणे वृक्ष लागवड च्या माध्यमातून प्रती व्यक्ती 3 झाडे लावणे मार्गदर्शन केले व ग्रामपंचायतिने इंडूरन्स कंपनीच्या सहकार्याने लावलेल्या 5500 वृक्ष लागवडीच्या शाळेच्या गट नंबर मध्ये भेट देऊन समाधान व्यक्त केले. त्या प्रसंगी जनार्धन विधाते उपविभागीय अधिकारी कन्नड संजयजी वारकड तहसीलदार कन्नड हारून शेख नायब तहसीलदार तालुका आरोग्य अधिकारी हेमंत गावंडे सरपंच अशोकराव दाबके उपसरपंच रिजवाणाबी रशीद शेख ग्रामविकास अधिकारी माणिकराव पगारे तलाठी चव्हाण आप्पा,सुरपाम आप्पा,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सदस्या व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.











