संजय डोंगरे
ग्रामीण प्रतिनिधी माना
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील भाजपा पक्षातर्फे हरीश पिंपळे यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली. शेवटचे दोन दिवस अर्ज भरण्याकरता शिल्लक असल्याने अत्यंत रहस्यमय रित्या, व उशिरा तिकीट वाटपामुळे पक्षातील काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे 200 कार्यकर्त्यांनी राजीनामा पत्रे पक्षश्रेष्ठीकडे घेऊन निघाले होते. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला होता. नवीनच पक्षात रवि राठी यांचा प्रवेश झाल्यामुळे, संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. याचीच दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन अखेर तीन टर्म गाजवलेले माननीय भाजपा आमदार श्री.हरीश भाऊ पिंपळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या या उमेदवारीमुळे नाट्यमय रित्या घडलेल्या कृतीवर पडदा पडला. लोकप्रिय असलेले आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे यांनी लोकोपयोगी उपक्रम घडवून आणले. सामाजिक बांधिलकी जोपासणारे व गरजूंना आर्थिक मदत देणारी असे आमचे लाडके नेतृत्व लाभलेले भाऊ त्यांचा मतदार संघात परिचय आहे. तळागाळातील शोषित व पीडित वंचितांना न्याय मिळवून देणारे गरिबांची जाण असणारे व संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारे असे आमचे हरीश भाऊ आप्पा पिंपळे आहेत. या मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे व लोकाभिमुख कार्य करणारे असं यांचं नेतृत्व आहे. पक्षश्रेष्ठींनी या कार्याची दखल घेऊन पुन्हा एकदा हरीश भाऊंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष करण्यात आला. त्याप्रसंगी हरीश भाऊंना आनंदाश्रू आवरेना झाले. याप्रसंगी बोलताना हरीश भाऊ पिंपळे म्हणाले की ही सगळी मेहनत पक्ष कार्यकर्त्यांची आहे तुमची मेहनत कामी आली मी जो काही आहे तो सर्वस्वी तुमच्यामुळेच आहे माझे तुम्हा सर्वांना तन-मन-धनाने सलाम आहे. असे म्हणत असताना त्यांना रडू कोसळले होते. आता माझी पुढची वाटचाल तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहो असे गौरव- उदगार काढले. पुढील वाटचालीस कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या