विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे महावीर डेअरीच्या वतीने चेअरमन डॉ. मोतीलाल सुरडे यांनी दीपावलीनिमित्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई व साबण वाटप केले. महावीर डेअरीकडे इंदापूर तालुक्यातील एक अग्रेसर डेअरी म्हणून पाहिले जाते. डेअरीच्या माध्यमातून पनीर, लस्सी ,ताक आदी दर्जेदार उत्पादने केली जातात. तसेच डेअरीच्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा व पशुखाद्य दिले जाते. त्याचप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला व वेळेवर दहा दिवसाला दर दिला जातो. या डेअरीचे डेली 4000 दूध संकलन होत असून 200 दूध उत्पादक शेतकरी या डेअरीला जोडले गेले आहेत. महावीर डेअरीच्या या दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.