स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा.काही जणांना नेहमीचे जेवनामुळेही त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचेच पदार्थ खाजेचे कारण ठरू शकतात.उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला खाज सुटते आजकाल लोकांच्या, मुलांच्या खाण्यात प्रचंड बदल झाले आहेत. त्यात जास्त फास्ट फूड, कुरकुरे, चिप्स, अगदी पाच-पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत. फास्ट फूडमध्ये तर नाना तर्हेचे रंग मिसळले जातात. तंदुरीवर तर ब्रश घेऊन रंग लावला जातो. त्यांच्या खाण्यामध्ये ऍजिनोमोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते. कुठलाही फास्ट फूडचा प्रकार सांगा, तो बनवण्यासाठी या ऍजिनोमोटोचा वापर केला जातो. कारण त्याने म्हणे पदार्थाला चव येते व हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे. हा सेवन केल्याने अंगाला खाज येते. पुरळ उठतात. तेव्हा फास्ट फूड खाणार्यांनो, सावधान!!! तुमच्या अंगाला खाज सुटू शकते.
आपण शरीरावर धारण केलेल्या वस्तूंमुळे, अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टीमुळेसुद्धा अंगाला खाज सुटते. जसे -सिनथेटिक कपडे, कपाळावरील टिकली, साबण, नकली दागिने या सगळ्या गोष्टींनी अलेर्जी निर्माण होऊन त्या भागावर पुरळ व खाज निर्माण होते. काही जणांना काही गोळ्या-औषधे घेतल्यानंतर शरीरावर खाज येऊ शकते. आपल्याला कोणत्या गोळयामुळे त्रास झाला हे लक्षात ठेवून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा.त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते- खरूज, नायटा, बुरशी, सोरिअसिस, पित्त, ऍलर्जी, लिकेन प्लेनस, डोक्यातील कोंडा, यासारखे असे अनेक त्वचाविकार आहेत ज्यामधे खाजेचा त्रास होतो. विविध प्रकारच्या रोगांमध्येही रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येते.