शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
महायुतीसाठी डोकेदुखी.
परभणी: मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर विधान सभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभे
प्रमाणेच आता विधान सभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर महायुती साठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदार संघातून उमेदवार देणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. त्याप्रमाणेच आता मराठवाड्यातील एकूण ४६ जागांपैकी मराठा मताचा टक्का जास्त असलेल्या जागांवर जरांगेंनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्येच परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदार संघातून उमेदवार देणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले. तर गंगाखेड आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार यांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे पाटलांनी केलेल्या घोषणेनंतर परभणी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चलबिचल सुरु झाली आहे. परभणी जिल्ह्यात एकूण चार विधान सभा मतदारसंघ येतात. यामध्ये परभणी, जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. चारपैकी तीन विधान सभा मतदारसंघा विषयी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.पाथरी विधान सभा मतदारसंघात जरांगेंचे उमेदवार पाथरी विधानसभा मतदार संघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. या मुळे मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारास पोषक वातावरण दिसत आहे. याचा विचार करता मनोज जरांगे पाटील यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाथरी विधानसभा मतदार संघातून जरांगे पाटील यांच्याकडून निडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा देखील समावेश आहे. आता यांच्यापैकी कोणाला जरांगे पाटील यांच्या कडून उमेदवारी घोषित होते, हे पाहावे लागणार आहे. गंगाखेड, जिंतूर मतदारसंघात आमदारांना पाडण्याचा डाव
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे सध्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सध्या नेतृत्व करत आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याविषयी विरोध दर्शविला होता. त्याच बरोबर त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणा ला देखील पाठिंबा दिला होता. आमदार रत्नाकर गुट्टे यांची भूमिका मराठा आरक्षणविरोधी असल्याने मतदार संघातील मराठा बांधव त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे च मनोज जरांगेपाटील यांनी गंगाखेड विधान सभा मतदार संघात आमदार रत्नाकर गुट्टे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार अस ल्याचे जाहीर केल आहे.जिंतूर विधान सभा मतदारसंघात मागील पाच वर्षे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर कार्यर त होत्या. मेघना बोर्डी कर या भाजपच्या आमदार असल्याने त्यांनी मराठा आरक्षणा विषयी स्पष्ट भूमिका घेतली नाही. नुकत्याच झालेल्या दसरा मेळा व्यात मेघना बोर्डीकर यांनी पंकजा मुंडे यांच्या भगवान गडा वरील मेळाव्याला देखील हजेरी लावली. पण मनोज जरांगे पाटील यांच्या नारायण गडावरील मेळाव्याकडे पाठ फिरवली.त्यामुळे मराठा समाजामध्ये मेघना बोर्डीकर यांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे. मेघना बोर्डीकर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात आणि त्याचाच फटका आता त्यांना या विधानसभा निवडणु कीत बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे परभणीच्या चारही विधानसभा मतदार संघातील मराठा समाज हा कोणाला मतदान करतो यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबुन आहे.