सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजार मध्ये एका कापड दुकानातील गोदामात दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी वाजता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून नऊ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केले असून यात गुरन. १८०/२४ कलम ४,५ मजूका नुसार आरोपी विठ्ठल शंकर हेमके,सुनील मोहन गुडमलवार, अर्जुन माधव पवार,विष्णू दीपक धमने,रोकडेश्वर सायन्ना कामेनवार,शेख सुलेमान शेख अहमद,गंगाधर सायन्ना पुप्पलवार, राजू नागनाथ सोळंके, अभिजीत मारोती धरमुरे यांच्यावर कलम विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार अड्ड्यावर धाड टाकले तेव्हा. जागावर एकूण मुद्देमाल २२ हजार २५० रुपये जप्त करण्यात आले आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शंकर चव्हाण हे करीत आहेत.