अझहर पठाण
शहर प्रतिनिधी कळंब
कळंब: धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ 242 निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रणित महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारीचा अर्ज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,नानासाहेब काका पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.जनसेवेचे कार्य करत गेली पाच वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून धाराशिव व कळंब तालुक्यातील जनतेची आपण प्रामाणिकपणे सेवा केली आहे.या काळात अनेक विकासकामे पूर्णत्वास नेली.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, श्री येडेश्र्वरी देवी, संत गोरोबा काका यांचे आशीर्वाद घेऊन धाराशिवचे ग्रामदैवत श्री धारासुर मर्दिनी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी रहे, काळा मारुती, संत गाडगे महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले..
जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासावर आपण मैदानात उतरलो आहोत.. हीच मायबाप जनता पुन्हा एकदा जनसेवेची संधी देईल हा ठाम विश्वास आहे.