उत्तम फड तालुका प्रतिनिधी उदगीर
उदगीर:- दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी शासकीय विश्रामगृह अवघी स्वामी कॉलेज जवळ उदगीर जिल्हा लातूर येथे छत्रपती शिवाजी राजे चँरिटेबल ट्रस्ट कडून सर्व क्षेत्रातील निवड झालेल्या व्यक्तीना छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार व कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा मा. आ. श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तरी छत्रपती शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री उतमराव देवदासराव बिरादार यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा संपर्क क्र. 9763943324. या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके व परिसरातील सर्व क्षेत्रातील व्यक्तीने सहभाग नोंदवावा. व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे . या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माजी क्रीडामंत्रीतथा जळकोट व उदगीर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. संजय भाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षताली संपन्न होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील तळेगावकरष उदगीर नगर परिषदेच्या अध्यक्ष स्वातीताई हुडे, उपजिल्हाधिकारी मा. सुशांत शिंदे, भाजपा अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष इंजि. विश्वजीत गायकवाड ,नगर परिषद उपाध्यक्ष शीलाताई शिंदे, गट नेते अनिल मुधाळे, पंचायत समिती सभापती मरलापल्ली ताई, उपसभापती भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अण्णा हुडे, माजी सभापती कल्याण पाटील, माजी सभापती बापूराव राठोड ,सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजीत भैय्या गायकवाड, तहसीलदार मा. राम बोरगावकर, बी. डी. ओ. मेडेवार, छावा व मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश चव्हाण, जिल्हा अध्यक्ष विशाल देवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंडित सुकनिकर, संतोष कारभारी, प्रदीप जाधव, राहुल पाटील, युवा उद्योजक मारुती जोगी, राम उद्देश, सुनील पाटील,अँडव्हकेट प्रवीण नागमपल्ली, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर व पत्रकार मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभाग नोंदवावा असे आव्हान छत्रपती शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री अध्यक्ष उत्तमराव बिरादार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे आहे.







