रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव:(काळी दौलत: पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमळ फुलविल्याबदल काळी दौ.येथील जगतगुरु संत सेवालाल महाराज चौकात भाजपा पध्दअधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळन करून घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.तसेच बसस्टँड परिसरातील नागरिकांना मिठाईचे वाटप करुन भाजपाने निवडणुकीत यश संपादन केल्याने कार्यकर्ते यांनी विजयांचा जल्लोष साजरा केला.यावेळी काळी दौ.येथिल भाजपा चिटणीस सुनिल टेमकर,मंडळ अध्यक्ष राजेश राठोड,निवास मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.







