शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
मराठा मतदारांचे प्रभूत्व जास्त आहे त्यामुळे जरांगे पाटील फॅक्टर ठरविणार कोण आमदार होणार.
परभणी : परभणी जिल्ह्यात सर्वच मतदार संघात कुणबी मराठा समाज बहुसंख्येने आहे.
त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आकडेवारी लक्षात घेता असे दिसून येत आहे की,जर कोणाला असे वाटत असेल की, मी मराठा समाजाला डावलून आमदार होऊ शकतो तर त्याचा गोड गैरसमज आहे. आज सर्वच मतदारसंघात मराठा समाज जास्त प्रमाणात संख्येने मोठा वर्ग आहे. मतदाता म्हणून परभणी विधानसभा पाथरी विधानसभा जिंतूर विधानसभा गंगाखेड विधानसभा या चारी विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा कुणबी समाज भरपूर आहे आणि जास्त आहे प्रत्येक मतदारसंघांमध्ये कुणबी मराठा समाजाचा 40% हिस्सा आहे. या समाजाने ठरवलंय की आमदार कोणाला करायचं तोच आमदार होतो कोण्या आमदारा ला पाडायचं का विजयी करायचं हा समाज ठरवतो. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कुंनबी मराठा समाजाचे प्राबल्य आहे. पाथरी विधान सभा मतदारसंघात 75000 महिला व पुरुष मतदार आहेत परभणी मतदार 80 हजार महिला पुरुष आहेत. जिंतूर विधान सभा मतदारसंघात 90,000 आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 85000 आहेत याच कुणबी मराठा समाजाने पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार असलेले माजी आमदार मोहन फड यांना निवडून आणण्याचे काम केले होते आणि ते निवडून आले होते. त्याचाच उदाहरण म्हणून प्रत्येक मतदारसंघात कुणबी मराठा ज्या पारड्यात मतदान करेन त्याच पारड्याचा आमदार होतो हे लक्षात असू द्या. वरील विषय मतदार संघात कुणबी मराठा समाजाचे जास्त प्राबल्य असून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांचे हाकेला शब्द प्रमाण माणून एकजूट झाला आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील हे जे सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करता येईल तरी सर्व मतदारांनी याची दखल घ्यावीच लागेल. मराठा समाजाच्या मागण्या मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच,मराठा म्हणून मुलांना मुलींना शिक्षणासाठी फी मध्ये सवलत देण्यात यावं, प्रत्येक मतदारसंघात रोजगार निर्मिती करण्यात यावी, मूलभूत सुविधा देण्यात यावे, महिलां साठी उद्योग उभारून महिलांचे सक्षमीकरण करण्यात यावे अशा विविध मराठा समाजाच्या मागण्या आहेत. चार-पाच दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातील सर्व पक्षा च्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार मराठा समाज आपल्याकडे कसा वाळविता येईल यासाठी प्रर्यत्नशील आहे. कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात चर्चा संवाद,बैठकाअंती निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वच उमेदवारांना चिंता वाटू लागली आहे. जरांगे फॅक्टर कोण्याच्या पथ्यावर पडणार याची माहिती येत्या दोन ते तीन दिवसात कळेल.